पिंपरी – भारतीय जनता पार्टी, पिंपरी दापोड़ी मंडल कामगार आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्त पद प्रदान सोहळा संपन्न झाला. दिनांक ०४/०३/२०२४ रोजी मोरवाडी येथील भाजप कार्यालयात भारतीय जनता पार्टी ,कामगार मोर्चाची पिंपरी दापोडी मंडल कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कामगार मोर्चाची पिंपरी-दापोडी मंडल कार्यकारणी मंडल अध्यक्ष सागर सूर्यवंशी यांनी जाहीर केली. या कर्यकरणीला पिंपरी दापोडी मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर , पिंपरी चिंचवड कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष नामदेव पवार यांनी मान्यता दिली.
भाजपा कामगार आघाडीच्या पिंपरी दापोडी मंडल कर्यकारणीत उपाध्यक्ष पदी सचिन कपिले, अयफाज कुरेशी ,प्रदीप नांगरे,दीपक बुद्धन यांची नेमणूक करण्यात आली. सरचिटणीस पदी संदिप शिंदे,विशाल चंपावत,महेश जिनवाल यांची नेमणूक करण्यात आली. चिटणीस पदी वसीम शेख,गणेश कुसळे,प्रमोद मोरे तर कार्यकारणी सदस्य पदी दीपक भालेरव,राजकुमार किरवले,अनिल गायकवाड,रफिक शेख यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे , प्रदेश सदस्य माऊली थोरात ,कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे ,पिंपरी चिंचवड कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष नामदेव पवार , पिंपरी दापोड़ी मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर , मंडल सरचिटणीस युवराज लांडे , मंडल उपाध्यक्ष सुधीर चव्हाण इ. मान्यवर उपस्थिती होते.
यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आणि कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, यांनी नवनिर्वाचित कर्याकारणीला नियुक्ती पत्र देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अंत्योदय श्रमिक कल्याणासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी काम करावे असे निर्देश सदाशिव खाडे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केले.
या वेळी हनुमंत लांडगे यांनी सर्वांना कामगार वर्गासाठी कामगार आघाडीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार वर्गासाठी तसेच त्याच्या कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या महत्वपूर्ण योजनांवर मार्गदर्शन केले. “कामगारांसाठी काम करतासतना माझी गरज भासल्यास अर्ध्या रात्री मला संपर्क कारा, मी उपलब्ध असेल’ अशी हमी त्यांनी या वेळी दिली.
सदर सोहळ्याचे सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले आणि निलेश अष्टेकर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.