पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१५ : पुणे शहरात परदेशी लोक संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. तसेच या परदेशी लोकांचा अंमली पदार्थांच्या तस्करी मध्ये सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
अशाच एका परदेशी व्यक्तीला अंमली पदार्थाची तस्करी करतांना विश्रांतवाडी परिसरातून अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. हि कारवाई गुरुवारी (दि १३) रोजी करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक 1 मधील अंमलदार संदीप शिर्के व प्रवीण उत्तेकर पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली कि, विश्रांतवाडी येथील बॉम्बे सॅप्रेस ए डी एम बटालियन सार्वजनिक रोडवर एक परदेशी इसम अंमली पदार्थ विकत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पॅट्रिक ॲमोस, ऊर्फ बोरा (वय 39) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ६ ग्राम कोकेन, मोबाईल फोन, मोटार सायकल तसेच रोख रक्कम असा सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १, श्री. सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, नितेश जाधव, रेहाना शेख, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांनी केली आहे.











