पुणे : ससून रुग्णालयाच्या प्रवेश द्वाराजवळ २ कोटींचे अंमली पदार्थ सापडल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. या मध्ये १ किलो ७५ ग्रॅम मोफोड्रॉन (एम डी) साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि एम पी डी ए गुन्ह्यात अटकेत असलेल्या कैदी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. तसेच रुग्णालयाच्या कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या कामगार मार्फत अंमली पदार्थाचे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
सुभाष जानकी मंडल (वय २९ रा.शीतल नगर, देहूरोड मु. पो. जि. देवघर, झारखंड) व येरावडा जेल मध्ये असलेला कुख्यात आरोपी ललित अनिल पाटील रुग्णालयाच्या कॅन्टीन मधला कामगार रौफ रहीम शेख (वय १९ रा. तडीवाला रोड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ससून रुग्णालयाच्या परिसरत अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कडून २ कोटी १४ लाख ३०हजार सहाशे रुपये किंमतीचे १ किलो ७५ ग्रॅम ५३ मि. ग्रॅम वजनाचे मोफोड्रॉन (एम डी) जप्त करण्यात आले आहेत. या तिघांविरोधात बनगार्डन पोलीस ठाण्यात एम पी डी ए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शुभांगी नरके करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे (गुन्हे), सह पोलीस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, संदीप जाधव, प्रशांत बोमादांडी, रविंद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी, दिशा खेवलकर, साहिल शेख, महेश साळुंखे, संदीप शेळके, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, यांनी केले आहेत.
अंमली पदार्थाची तस्करी करणारे हाय प्रोफाइल रॅकेट उघड












