पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१६ : मुंढवा परिसरात एम.डी.कोकेन,चरसची विक्री करणाऱ्या महिले सह तीन जणांना अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडून अटक करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये तब्बल शेहेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागर कैलास भोसले (वय २६ रा. शंकरनगर, खरेदी), अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (वय ४० रा. गुडविल ऑर्र्चीड,धानोरी),इम्ररीन गॅरी ग्रीन (वय ३७ रा. खोसे पार्क लोहगाव रोड) यांच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
सदर महिला व एक इसम हे लोणकर वस्ती येथे अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार विशाल दळवी यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपीं कडून चवेचाळीस लाख रुपये किंमतीचे २०८ ग्रॅम ९५० मीली ग्रॅम (एम.डी) व ५ ग्रॅम ५५० मीली ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. उर्वरित दोघा आरोपीं कडून अडीच लाख रुपये किंमतीचे ४ ग्रॅम कोकेन व ७१ ग्रॅम चरस, मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
सदर आरोपीं विरोधात भा.द.वि कलम एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क),२१(ब),२२(क),२९ अंतर्गत मुंढवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळ करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्ता रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे,शैलजा जानकर, पोलीस अंमलदार विशाल दळवी, मारुती पारधी, मनोज साळुंखे, राहुल जोशी, ज्ञानेश्वर घोरपडे, पांडुरंग पवार, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, सचिन माळवे, विशाल शिंदे, रोहना शेख, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते, यांनी केले आहे.












