मुंबई : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे.
आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल(सोमवारी) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा
अशोक चव्हाण यांनी काल (१२ फेब्रुवारी रोजी) आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा चर्चा केली होती.