अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष न बनवल्याने पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या वृत्तानंतर आज अजित पवार आणि त्यांना पाठिंबा देणारे पक्षाचे नेत्यांनी मुंबईतील राज भवनात शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,आदिती तटकरे, धर्मराव अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे राज्य सरकारमध्ये स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारमध्ये आणखी एक इंजिन आल्याने महाराष्ट्राचा विकास आता वेगाने होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुहेरी इंजिनचे सरकार सुरू होते. त्यात आता तीन इंजिन असून ते वेगाने धावेल. राज्याचा विकास आता वेगाने होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला तीन-चार जागाही मिळणार नाहीत, असे सांगताना शिंदे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बंडाला पाठिंबा देत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आता विरोधीपक्ष नेता कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.












