मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिले तर आठ दिवसातच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी निकालातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्यावर शिक्कामोर्तब केला. त्याचवेळी दोन्ही बाजूंचे आमदार पात्र असल्याचेही नार्वेकर यांनी निकालात स्पष्ट केले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सभा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भावनिक आवाहन केले. ते अनेकदा भावूक झाले होते. त्यावर बोलताना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती पण शरद पवार यांनी चुका पोटात घातल्या आणि तुम्हाला संधी दिली. तुम्ही कुठे कुठे काहीही बोलत होतात पण तरीही सगळं माफ करुन तुम्हाला सर्व महत्त्वाची पदे दिली. एससी एसटी आणि ओबीसी या सगळ्यांचा निधी थांबवण्याच काम अजित पवार यांनी केले. सर्वात जातीयवादी माणूस अजित पवार आहेत