पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १७ : अज्ञात इसमांनी शाळेत घुसून मुख्याध्यापकालाच जाब विचारत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पताशीबाई छाजेड ई लर्निंग स्कूल, बोपोडी येथे घडली असून एका इसमाने दोन अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आरोपींनी शाळेत येऊन तुमच्या शाळेत काय चालू आहे, शाळेतील शिक्षक कुठे आहेत, तुम्हाला कोणी नेमलेले आहे असे म्हणून मुख्याध्यापक यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला आहे.
आरोपींविरोधात भादवि कलम ३५३,५१०,२९४,५०४,५०६, म. पो. का. १२० गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.












