पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : बेडरूमच्या कपाटातील दागिने आणि पैसे चोरून घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.याप्रकरणी फिर्यादीने एका अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांना दागिने घेऊन गावी जायचे असल्याने त्यांनी बेडरूमचे कपाट उघडले. कपाटातील तिजोरी पाहिली असता त्यातील अकरा लाख रक्कम आणि सत्तावीस लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने असा सर्व मुद्देमाल कोणी अज्ञात इसमाने चोरून नेला असल्याचे समजले.
आरोपीवर भादवी कलम ४५४,४५७,३८० अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील हे करत आहेत.












