पुणे प्रतिनिधी
बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपी विरोधात स्थानबद्धतेची कारवाई कारण्यातर आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४५ वी स्थानबद्धतेची कारवाई आहे. सनी उर्फ संतोष भरगुडे वय २४ (राहणार- निलेश कॉम्प्लेक्स बिबवेवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सदरने त्यांच्या साथीदारासह बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत जीव घेण्या हत्यारांसह सरकारी नोकरदारांना धमकी, सरकारी कामकाजात अडथळा, विनयभंग, दरोडा, जिवे मारण्याची धमकी इत्यादी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभागी होते. सनी विरोधात मागील ५ वर्षांमध्ये ७ गुन्हे दाखल झालेले आहेत. जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान यामुळे नागरिक त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी धजावत नव्हते.
पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए अंतर्गत त्याच्यावर अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षाकरीता स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले आहेत. या कार्यवाहीमध्ये सविता ढमढेरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी गुन्हेशाखा पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.












