पुणे | प्रतिनिधी
पिंपरी – चिंचवड, दि.३० : भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका मुलीचे अश्लील फोटो कोणीतरी फेक अकाउंट बनवून व्हायरल करत असल्याची घटना घडली होती.याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दाखल केली होती.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे जनसंपर्क कार्यालय हे दैनंदिन पातळीवर अनेक समाज माध्यमांना प्रेस नोट पाठवत असते. दि.२९ रोजी वरील नमूद गुन्ह्याची प्रेस नोट पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सर्व प्रसार माध्यमांना पाथव्यात आली. मात्र या मध्ये गल्लत अशी झाली की त्यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये फिर्यादी मुलीचे अश्लील फोटो व्हायरल झालेल्या इंस्टाग्राम प्रोफाइल ची लिंक देण्यात आली होती. ज्यामुळे पीडित मुलीचे फोटो बघितले जाऊ शकत होते.
दैनिक राज्य लोकतंत्रच्या ही चूक लक्षात आली. संबंधित पोलीस ठाण्यात विचारले असता ते चुकीने झाल्याचे समजले. सादर घटनेचे निवदेन दैनिक लोकतंत्रने पिंपरी चिंचवड शहराचे अपर आयुक्त वसंत परदेशी आणि स्वप्ना गोरे ( उपआयुक्त ) यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनानुसार या घटनेची दखल घेत त्यांनी त्या प्रेस नोट मध्ये सुधारणा केली असून अशी घटना पुन्हा घडणार नाही असे आश्वासन देखील त्यावेळी त्यांच्याकडून देण्यात आले.












