पुणे : महाराष्ट्र नवनिर्माणण विद्यार्थी सेनेकडून आज पुणे विद्यापीठावर विराट मोर्चा काढण्यात आला. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. अमित ठाकरेंसोबत आई शर्मिला ठाकरेही या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेकडून या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सेनापती बापट रस्त्यावरील चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा विराट मोर्चा काढण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या संदर्भात अमित ठाकरे यांनी कुलगुरुंशी चर्चा केली. मनसेच्या या विराट मोर्चामुळे विद्यापीठ चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचेही पाहायला मिळाले. मोर्चामध्ये शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.