लोकतंत्र प्रतिनिधी
पुणे : मा. अमोल जनार्दन मोरे यांची आम आदमी पार्टीच्या पुणे शहर सचिव पदी निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष मा. सुदर्शन जगदाळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
त्यांनी इंग्लंड मधून MBA डिग्री मिळवली व त्यानंतर 2010 मध्ये ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर ते राजकीय प्रवासात सक्रिय झाले. अण्णांचे आंदोलन झाल्यानंतर आप पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सदस्य राहिले. त्यांनी भ्रष्टाचार विरोधात आवाज उठून कोथरूड व कर्वेनगर भागातून सक्रियपणे पक्षाचे काम केले. तसेच पक्षाच्या आंदोलनात व कार्यक्रमात सक्रिय भाग घेतले. त्यांची निवड महाराष्ट्रा प्रदेश संघटन मंत्री मा. अजित फाटके पाटील यांनी केली.












