पुणे दि.१७ : अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त सी आर रंगनाथ निवासी कर्णबधिर विद्यालय यांच्या मार्फत शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विजयजी कुंभार, राज्य संघटक अजित फाटके पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष सीमाताई गुट्टे, महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष मयूर दौडकर, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे हे या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर मीडिया प्रमुख अमित मस्के व सहकारी यांनी केले.

मूकबधिर व कर्णबधिर यांना ऐकायला येत नाही, म्हणून बोलता येत नाही म्हणूनच त्यांची गणना मूकबधिर होते. स्वतःच्या व्यंगामुळे आत्मविशेष गमावून बसलेली मुले सामान्यांपासून लांब राहतात. त्यांच्या स्वप्नांना उंच भरारीसाठी पंख फुटत आहे. कारण त्यांच्या पंखाना बळ देणारी रंगनाथ निवासी कर्णबधिर विद्यालय टिंगरे नगर पुणे येथे मिळाले आहे.












