पिंपरी २९ : क्रीडाक्षेत्र हे युवक – युवतींसाठी एक आव्हान आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, असे असले तरी कोणताही क्रीडाप्रकार निश्चित करून संबंधित क्रीडाप्रकारातील मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सतत सराव करणे हीच क्रीडा क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य प्रो. डॉ. माधव सरोदे यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला सदर प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने मुले व मुलींसाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. सदर मॅरेथॉनचा प्रारंभ छत्रपती पुरस्कार विजेते मा. सागर कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या मॅरेथॉनमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक संतोशी नरळकर, द्वितीय क्रमांक शेजल शिंदे, तृतीय क्रमांक सेजल रामअचल, मुलांमध्ये प्रथम क्रमांक गणेश आठवले, द्वितीय क्रमांक सुरज मुंगसे, तृतीय क्रमांक हृषीकेश लांबोळे यांनी मिळविला. याप्रसंगी विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, उपप्राचार्य प्रा. अनिकेत खत्री, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे यांनी परिश्रम घेतले. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे यांनी मॅरेथॉनचे संयोजन केले