पुणे प्रतिनिधी
आळेफाटा – अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना मिळाल्यानंतर सोमवार दिनांक २ रोजी दुपारच्या सुमारास आळेफाटा पोलीस तसेच महिला ग्रामस्थ, बचत गटातील महिला, यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्री केंद्रावर जाऊन धडक कारवाई केली आहे. यामध्ये पोलीसांनी नारायण परशुराम शिंगाळ वय ६५) राहणार सुरकुलवाडी (नळवणे) यास ताब्यात घेतले आहे.
या ठिकाणी झालेल्या कारवाईत एकूण १३ जीएम संत्रा कंपनीच्या कॉटर १८० मिली मापाच्या प्रत्येकी किंमत ७० रुपये किमतीच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. सुरकुलवाडी गावातील नारायण परशुराम शेंगाळ यांनी घराच्या पाठीमागे आडोशाला हा बिगर परवाना देशी दारूच्या व्यवसाय सुरू केला होता.
यात एकून ११० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अशी फिर्याद आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन लहानु राहणे यांनी दिली आहे. यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, विकास गोसावी तसेच ग्रामस्थ नळवणे, सुरकुलवाडी गावच्या महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.












