पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८ : विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.किरण सुनील पारगे ( वय ३८ रा. वारजे माळवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
दि.१७ रोजी वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन चालू होते.त्यावेळी वारजे पोलिस चौकीचे बिटमार्शल पोलिस अंमलदार तांगडे व काटे हे दोघे गस्त घालत होते.संघर्ष चौकात एक इसम रिव्हॉल्वर घेऊन थांबला आहे अशी माहिती त्यांना पोलिस कंट्रोल रूम वरून मिळाली.
बिटमार्शल पोलिस अंमलदार तांगडे व काटे यांनी वरिष्ठांच्या अध्यक्षतेखाली आरोपी याला ताब्यात घेतले.त्याच्या जवळील सामानाची झडती घेतली असता त्याच्या स्कुटीच्या डिकीत देशी बनावटीचे रिव्हॉल्वर सापडले आहे.
रिव्हॉल्वर ताब्यात घेऊन त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नरेंद्र मुंढे हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ पुणे शहर श्री सुहेल शर्मा मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, श्री भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांच्या आदेशान्वये तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, अमोल सावंत, पोलीस अंमलदार राहुल कदम, बालाजी काटे व निखील तांगडे यांनी केलेली आहे.












