मुंबई : सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आपल्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश कारणार आहेत.
आज (१३ फेब्रुवारी २०२४ रोजी ) अशोक चव्हाण यांचा भाजपात पक्षप्रवेश होईल, परंतू चव्हाण यांच्यासह आज अमर राजूरकर हे देखील भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.