अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. गेल्या काही महिन्यापासून अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे ११ समर्थक आमदार सुद्धा भाजपच्या वाटेवर असून आजच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला हा सर्वात मोठा हादरा म्हणावा लागेल.
महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस यांचे सरकार आले तेव्हा सुद्धा बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा त्यावेळी सुरु होती. त्यातच दुसरीकडे भाजपच्या प्रदेश कार्यालयात सुद्धा नेत्यांची मोठी लगबग सुरु आहे. बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशासाठीच ही लबबग सुरु आहे असं बोललं जात आहे.