पिंपरी (प्रतिनिधी)
त्रिवेणीनगर येथील दिल्लीस्थित टोस्टमास्टर्स संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित केली होती.
टोस्टमास्टर्सच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत सेंट ॲन्स हायस्कूलच्या श्रुती सुभाष चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये अडीच लाख रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स शाळेत अकरावीत शिकत आहे. आयोजकांनी ऐनवेळी श्रुतीला “ट्रांसफॉरमेशन ऑफ़ कंट्री” या विषयावर बोलायला सांगितले. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने चांगली मांडणी केल्यामुळे तिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले.
या स्पर्धेत जगभरातून सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी होते. या यशाबद्दल सेंट ॲन्स हायस्कूलच्या सचिव ॲनी फ्रांसिस यांच्या हस्ते श्रुतीचा सत्कार करण्यात आला. तिचे वडील एका कंपनीत क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. सर्वच स्तरातून श्रुतीने मिळवलेल्या यशाचे कौतुक होत आहे.












