प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला देशात अनेक बदल होत असतात. आजपासून (१ एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे आजपासून अनेक क्षेत्रात बदल झाले असून याचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडर, ईपीएफओ, एनपीएस, फास्टॅग केवायसी, एसबीआय क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड यांच्याशी संबंधित बदल आजपासून झाले आहेत.
एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas) –
दर महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्या च्या किमती संशोधित करतात. आजपासून च्या दरांमध्ये घट झाली आहे. मात्र ही घट घरगुती सिलेंडरच्या किमतीत झाली नसून १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये झाली आहे. देशाच्या राजधानीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत ३०.५० रुपयांनी कमी झाली आहे. मुंबईमध्ये ३१.५० रुपयांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.
ई.पी.एफ.ओ. (EPFO) –
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) फंड बॅलेन्ससाठी ऑटोमेटिक ट्रांसफर नियम लागू केला आहे. कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यास पीएफ अकाऊंट परस्पर नव्या नोकरीच्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरी बदलल्यानंतर पीएफ मधील रक्कम नवीन खात्यात ट्रान्सफर करावी लागणार नाही. आता ती ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार आहे.
एन.पी.एस. (NPS) –
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण ने नॅशनल पेन्शन सिस्टम ला आणखी सुरक्षित बनवले आहे. यासाठी आधार आधारित टू स्टेप ऍथोन्टीकेशन करावे लागणार आहे. हा नियम १ एप्रिल पासून लागू करण्यात आला आहे.
फास्टॅग केवायसी (Fastag KYC) –
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग केवायसी अनिवार्य केले आहे. वाहन धारकांनी त्यांचे फास्टॅग केवायसी अपडेट केले नसेल तर त्यांचे फास्टॅग काम करणार नाही. त्यामुळे १ एप्रिल पासून अशा वाहन धारकांना टोल देखील भरता येणार नाही.
विमा पॉलिसीचे डिजिटलायझेशन –
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमा पॉलिसीचे डिजिटलायझेशन अनिवार्य केले आहे. हा नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू झाला आहे. आरोग्य आणि सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळतील.
एस.बी.आय. क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) –
AURUM, SBI Card Elite, SBI Card Elite Advantage, SBI Card Pulse, Simply CLICK SBI Card या कार्डचे पैसे भरल्यानंतर मिळणारे रिवॉर्ड पॉईंट बंद करण्यात आले आहेत. याची एसबीआय कार्डने यापूर्वीच घोषणा केली आहे.
एस.बी.आय. डेबिट कार्ड –
एस.बी.आय. बँकेने डेबिट कार्डच्या वार्षिक देखभाल शुल्कात पूर्वीपेक्षा 75 रुपयांनी वाढ केली आहे. क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस, गोल्ड, कॉम्बो, माय कार्ड, प्लॅटिनम डेबिट कार्डच्या वार्षिक देखभाल शुल्कात वाढ करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे.
वाहन खरेदी महाग –
इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे आजपासून महाग होणार आहे. फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स अंतर्गत उपलब्ध सबसिडी सरकारने बंद केली आहे.
नवीन कर व्यवस्था –
सरकारने आजपासून नवीन कर प्रणाली डीफॉल्ट केली आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत कर भरायचा असेल तर तुम्हाला तो स्वतः निवडावा लागणार आहे.