आम दमी पार्टी ला महाराष्ट्रात काही जागा देऊन एकत्र लढावं, अन्यथा पराभवाचा हरियाणा पॅटर्न वाट्याला येईल – आप संघटनमंत्री प्रदिप थोरवे.
हरियाणात आम आदमी पार्टी वेगळी लढल्याने पराभव झाला! २८ उमेदवार ५००० च्या फरकाने पडले! इंडिया आघाडी तुटल्याचा परिणाम हरियाणा मध्ये दिसत आहे.आम आदमी पार्टी ला काँग्रेसने सोबत घेतलं असतं तर काँग्रेसचे पाच हजाराच्या फरकाने २८ आमदार पडले नसते. गेल्या लोकसभेला देशातील आम अदामी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यावेळी महाराष्ट्रात आप च्या कार्यकर्त्यांच कौतुक शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यानी केलं होत. परंतु फक्त कौतुक करून चालणार नाही तर, राज्यात महाविकास आघाडीने या निकालातून गंभीर्याने बोध घ्यावा,आणि आम दमी पार्टी ला महाराष्ट्रात काही जागा देऊन एकत्र लढावं आणखी नव्याना सोबत घ्यावं पण वेगळं लढू नये.महाराष्ट्रात इंडिया आघाडी टिकवावी, अन्यथा पराभवाचा हरियाणा पॅटर्न वाट्याला येईल. असे प्रतिपादन आम आदमी पार्टी चे महाराष्ट्रचे संघटन मंत्री प्रदिप थोरवे यांनी केलं आहे.