
पुणे दि।१७ : गेल्या पंधरा दिवसांपासून पुणे पोलिसांकडून रेकॉर्डवरील सराईत आरोपींची कोंबींग ओप्रेशन व नाकाबंदी करून झाडाझडती घेण्यात आली आहे. या दरम्यान शहरात विविध ठिकाणावून १,५९३ जणांची झाडाझडती तर ३९३ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवार दि.१६ रोजी संध्यकाळी ६ ते सोमवार दि.१७ सकाळी ६ पर्यंत करण्यात आली. पुणे शहरातील सर्व पोलीस स्थानक व गुन्हे शाखेच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली आहे.
सदर मोहिमे दरम्यान पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः कोम्बिंग ओप्रेशन व नाकाबंदी सहभाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
या वेळी पुणे शहरात एकूण ३२ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली व २,३३१ वाहने चेक करण्यात आले आहे. तसेच १३४ हॉटेल,लॉजेस,गेस्टहॉउस व २५७ फरार व २२८ तडीपार आरोपींना चेक करण्यात आले. सदर नाकाबंदी दरम्यान ३,४४३ संशयित वाहन चालकांना चेक करून ७६७ वाहन चालकांवर कारवाई करून ६ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सदर मोहिमे दरम्यान एकूण १३ आर्म ॲक्ट कारवाईत १६ आरोपींना अटक कारण्यात आली आहे. मुंबई प्रोव्हिबिशन ॲक्ट ९ कारवाईत १२ आरोपी अटक,मोक्का क १४२ प्रमाणे ६ कारवाईत ६ आरोपी अक्ट, जुगार ॲक्ट प्रमाणे १ कारवाईत ४ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे ,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील,अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त परि-१ संदीप सिंह गिल्ल,पोलीस उपायुक्त परि-२ स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त परि-३ सुहेल शर्मा, पोलीस उपायुक्त परि-४ शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परि-५ विक्रांत देशमुख,पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने हे कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी चेकिंग राबविले.












