पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१४ : रेकॉर्ड वरील आरोपींना आश्रय व मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथक-२ व लष्कर पोलीस स्थानक यांच्या कडून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली आहे. शुभम प्रीतम सारवान (वय २७ रा.शंकरशेठ रोड,कॅम्प पुणे), अजीम सलीम शेख (वय २९ रा.कॉलनी नं.१०,कासेवाडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सदर रेकॉर्ड वरील आरोपी अलेक्स गवळी व त्याचे १० ते १५ साथीदार गुन्हा केल्या पासून फरार होते. तपास दरम्यान दोघा आरोपींना ताब्यात घेतले असता,गुन्ह्यातील फरार आरोपींची मदत केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपी विरोधात लष्कर पोलीस स्थानकत भा.द.वि. कलम ३०७,१४३,१४७, १४८,१४९, ४२७,आर्म अक्टकलम ४(२५),महाराष्ट्र पोलीस अक्ट कलम ३७(१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहा.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त सतीश गोवेकर,यांच्या मार्गदशनाखाली खंडणी विरोधी पथक-२ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,लष्कर पोलीस स्थानक वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण,सहा.पोलीस निरीक्षकचांगदेव सजगने,पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहन जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव,प्रदीप शितोळे, संग्राम शिनगारे,सुरेंद्र जगदाळे,भोजराज, अहिवळे,पिलाने,आपटे,मेंगडे,आंधळे,भोसले,शिरोळकर,उत्तरकार,गोडे,वर्गे यांनी केली आहे.












