पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१४ : सिंहगड रोड परिसरात दोन अज्ञात इसमांनी रहिवासी इमारतीच्या आर्थिंगची वायर चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने मुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदर आरोपी विरोधात सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास सुरु असताना आरोपी हे नवले ब्रिज खाली पांढऱ्या रंगाच्या गाडीवर थांबले असल्याची माहिती पोलीस अंमलदार देवा चव्हाण व स्वप्नील मगर यांना बातमी दारामार्फत माहिती मिळाली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत आरोपी रविंन्द्र प्रकाश देशमुख (वय ३४ रा.सध्या वेताळ बुवा चौक,न-हेगाव ,मूळ,ता.माजल, जि.बीड), हेमराज शांताराम पाटील (वय २७ रा.अभिनव कॉलेज रोड,न-हेगाव), यांना ताब्यात घेतले असून तपासा दरम्यान सदर आरोपींनी आठ ते दहा दिवसांपूर्वी चोरी केली असल्याचे सांगितले. सदर आरोपींकडून वायर व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असे एकूण ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींवर सिंहगड रोड पोलीस स्थानकात भा.द.वि कलम ३८०,३३६,३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गणेश मोकाशी करीत आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रवीण कुमार पाटील,पोलीस उप आयुक्त पऱि-३ सुहेल शर्मा, सहा.पोलीस आयुक्त गजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर,यांच्या मार्गदर्शना खालीसहा.पोलीस निरीक्षक सचिन निकम,पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी,अंमलदार देवा चव्हाण व स्वप्नील मगर, आबा उतेकर, संजय शिंदे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, रामभाऊ वेगरे, दक्ष पाटील, विकास पांडुळे, अमोल पाटील, सागर शेगडे, विकास बांदल,अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली आहे.












