लग्नसराई आता सुरू आहे. लग्नसराईमध्ये अनेक ठिकाणी लग्न हळदीच्या कार्यक्रमाला स्पीकर लावले जातात. स्पीकरच्या कर्कश्य आवाजामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशाच कर्कश्य आवाजाला त्रस्त होऊन एका वृद्ध व्यक्तीनेआवाज कमी करण्यास सांगितले असता मारहाण झाल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे.
येरवड्यातील नवी खडकी परिसरात आरोपी चेतन बेले वय 26 (रा नवी खडकी येरवडा) यांच्या हळदीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजाने स्पीकर लावण्यात आलेले होते बाजूला राहणाऱ्या फिर्यादींच्या वडिलांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करण्यास सांगितले त्यावेळी आरोपी आणि त्यांच्या मित्रांनी गैरवर्तवणूक करत त्यांना पुन्हा परत पाठवले. फिर्यादींच्या वडिलांना या आवाजाचा त्रास होत असल्यामुळे ते पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले असता शाब्दिक वादाला सुरुवात झाली. फिर्यादी, त्यांची बायको आणि त्यांचा मुलगा हे पाहताच तेथे आले. याच वादामध्ये आरोपी चेतन बेले यांनी फिर्यादी यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. फिर्यादी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. आरोपींना हे कळाले असता आरोपींनी व त्यांच्या मित्रांनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन फिर्यादीच्या वडीलास व पत्नीला लाठीने मारहाण केली. याच प्रकाराचा फिर्यादींच्या वडिलांना समाजात आपल्याला योग्य वागणूक मिळत नाही असे वाटले. फिर्यादींच्या वडिलांनी हेच मनात ठेवून बंडगार्डन पुलावरून उडी मारून आत्महत्या केली.
येरवडा पोलीस स्टेशनमध्ये भादविक ३०६, ३२४,३२३, ५०४, १४८, १४९, १४७, १४८, १४९, महा पो का ३७, (1)(3) आर्म ऍक्ट 4(25) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच आरोपींना अटक करून तीन दिवसाची कस्टडी देण्यात आली आहे. एकूण आरोपीपैकी चार आरोपींचा तपास उपनिरीक्षक शेलार करत आहेत.
आवाज कमी करण्यास सांगितले म्हणून मारहाण: वृद्धाची आत्महत्या












