इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर शहर बाह्यवळणाजवळ मंगळवारी (ता.२४) अपघात झाला होता. यावेळी संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामध्ये एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला. घटनेबाबत इंदापूर पोलिस ठाण्याने संबंधितावर १४ जणांवर गुन्हे दाखल केला आहे.
याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अर्जुन पांडुरंग नरळे यांनी फिर्याद दिली आहे. गलांडवाडी नंबर १ गावचे हद्दीतील सोलापूर-पुणे हायवे रोडचे कडेला असलेल्या मातोश्री हॉटेलच्यासमोर अपघातातील ट्रक नंबर सुद्धा तेथे जमलेल्या जमावाने पेटवून दिला. यामुळे अंदाजे १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या वाहनाला साधारण एक तास आडवून आग आटोक्यात आणू दिली नाही.
तेव्हा त्या जमावाला समजावून सांगून जमाव पांगविण्याचे आदेश दिले. तरीही संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवून पोलिसांच्या आदेशाची अवज्ञा केली व पोलिसांशी धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून त्यांच्या विरोधात सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली












