भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपला वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. यामध्ये ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला मोठा फटका बसला आहे. त्यांना बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
याआधीच्या करारात श्रेयसला बी श्रेणीत आणि ईशानला सी श्रेणीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी श्रेयसला वर्षाला ३ कोटी रुपये आणि ईशानला १ कोटी रुपये मिळत होते. मात्र आता त्यांचे इतके कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची यादी (ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४)
A+ ग्रेड – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
ए ग्रेड – आर अश्विन, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.
बी ग्रेड – सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
सी ग्रेड – रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.
आकाश दीप, विजयकुमार विशाक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वत कवेरप्पा यांचा वेगवान गोलंदाजीच्या करारात समावेश करण्यात आला आहे.
याआधीच्या करारात श्रेयसला बी श्रेणीत आणि ईशानला सी श्रेणीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी श्रेयसला वर्षाला ३ कोटी रुपये आणि ईशानला १ कोटी रुपये मिळत होते. मात्र आता त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.