पुणे प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील कामशेत येथील उकसान गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (दि. ८ ऑक्टोबर २०२३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. नाकातोंडात पाणी गेल्याने सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून हा घातपात आहे, आत्महत्या की बुडून मृत्यू याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
याप्रकरणी पोलीस पाटील दत्तात्रय बबन वाल्हेकर (रा. उकसान, ता. मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पुरुष (अंदाजे वय ३५ ते ४०) यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची कामशेत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उकसान (ता. मावळ) गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात एक अनोळखी पुरुष (वय अंदाजे ३५ ते ४०) यांचा मृतदेह आढळला आहे. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र मयताची अद्याप ओळख पटलेली नसून त्याच्या वर्णनानुसार ओळख पटल्यास अथवा नातेवाईकांचा शोध लागल्यास तात्काळ कामशेत पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. पुढील तपास कामशे लीस करत आहेत.
मयताचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे-
पुरुष, उंची ५ फुट २ इंच, रंग गोरा, बांधा मध्यम, डोक्यावर टक्कल, पायात काळया रंगाचे सैंडल, अंगात पांढया रंगाचा शर्ट, निळया रंगाची फुल पॅन्ट, तसेच मयताचा चेहरा ओळखु येत नसुन मृतदेह सडलेल्या अवस्थेत व जलचर प्राण्याणी ठिकठिकाणी खाल्लेल्या अवस्थेत असून ओळखीची कोणतीही खुण शरीरावर दिसून येत नाही.












