मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी ते कोलोशीस रोडवर उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय आरोग्य विभागाच्या वतीने येथील दोन वैद्यकीय व्यावसायिकांकडून ७०,०००/- रुपयाचा तर डेंग्यू अळ्या आढळल्याबद्दल एका व्यवसायिका कडून १०,०००/ रुपयांचा दंड असा एकूण ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे आणि अमर सूर्यवंशी यांच्या पथकाने चिखली मोशी परिसरात आज (दि. २६ रोजी ) करण्यात आली.
मंगलम क्लिनिक चिखली व श्री समर्थ क्लिनिक मोशी या दोन्ही वैद्यकीय व्यावसायिकां कडून प्रत्येकी ३५ हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.












