पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २९ : दहीहंडीच्या पाश्वभुमीवर वारजे पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. एका दिवसात २ पिस्टल व ७ काडतुसे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करून दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुरज शिवाजी भडवे (वय २३ रा. डॉ. बाबा साहेब आंबडेकर वसाहत, राहुल नगर,शिवणे),अनिकेत अनुरथ आदमने (वय २१ रा. वारजे माळवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पेट्रोलींग दरम्यान सदर आरोपी हे धनगरबाबा बस स्थानकाच्या मागे एनडीए ग्राउंड परिसरात दोन संशयित थांबले असल्याची माहिती पोलीस अंमलदार श्रीकांत भांगरे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून एक देशी बनावटीचे पिस्टल, ४ जिवंत काडतुसे व विधिसंघर्षित बालकाकडून एक लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले आहे.
तसेच कारवाई दरम्यान वारजे स्मशानभूमी समोरील पूलखाली दोघा संशयितांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडून एक देशी बनावटीचे पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व विधिसंघर्षित बालकाकडून एक लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा, सह पोलीस आयुक्त भीमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर, नरेंद्र मुंढे, विशाल मेंडे, पोलीस आमदार प्रदीप शेलार, अमर राऊत, विजय भूरुक, श्रीकांत भंगरे, विक्रम खिलारी, अजय कामठे, अमोल सुतकर व राहुल हंडाळ यांनी केले आहे.












