भोसरी एम.आई.डि.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. १३ ऑक्टोबर रोजी प्रफुल गौतम जाधव या २५ वर्षीय तरुणाचे काही लोकं सोबत भांडण झाले होते, या भांडणाचा राग मनात धरून प्रफुल याला दि. १४ ऑक्टोबर रोजी कुणाल गवारगुर, अजय शेजोळ व गौरव शेजोळ यांनी रस्त्यात अडवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची तक्रार प्रफुल याने भोसरी एम.आई.डि.सी. पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कुणाल गवारगुर (वय २०, रा. भोसरी एम.आई.डि.सी.), अजय शेजोळ (वय २२, रा. कात्रज पुणे) व गौरव शेजोळ (वय २३, रा. कात्रज पुणे) यांच्या विरोधात भा.न.स. कलाम १०९, ३५९(२) व ३(५) अन्वय गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रफुल हा दि. १४ रोजी ७ वाजे च्या सुमारास कामावरून घरी पायी जात असताना जी.आई.सी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथील सचिन कँटीन च्या समोर त्याला दि. १३ ऑकटोबर रोजी झालेल्या भांडणाच्या रागातून अडवले. कुणाल गवारगुर याने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यावर कोयत्याने वार केला तसेच अजय शेजोळ याने आरोपीला पकडून ठेवल्याने गौरव शेजोळ याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. कुणाल गवारगुर याने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवत ‘मी फुलेनगरचा भाई आहे, तू मला ओळखत नाही का? तू माझाशी पंगा का घेतला? तुला आता जिवंत सोडणार नाही, तुला वाचायला कोणी आल्यास त्यालाही सोडणार नाही’ असं म्हणाला असता तेथील लोक घाबरून सैरावैरा पळून गेली. पोलिसांनी या बाबतची गंभीर दाखल घेतलीअसून आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपस भोसरी एम.आई.डि.सी. पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.