पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : हात चलाखीने नागरिकांच्या एटीएम कार्डाची चोरी करून त्यातील रक्कम काढून घेणाऱ्या आंतर राज्यीय टोळीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मयंककुमार संतराम सोनकर ( वय २७, रा.व्दारका सकुंल अपार्टमेंट, परांडेनगर, धानोरी, पुणे ), कपील राजाराम वर्मा ( वय-३० वर्षे, सकुंल अपार्टमेंट, परांडे नगर, धानोरी, पुणे ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ रोजी फिर्यादी हे विश्रांतवाडी येथील बँक एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता आरोपींनी हात चलाखीने ते एटीएम कार्ड काढून घेत वेगवेगळ्या एटीएम सेंटर मधून त्यातील पैसे काढून घेत एकूण ८७,५८० रुपयांची फसवणूक केली.
तपासादरम्यान आरोपी हे विश्रांतवाडी येथील सारस्वत बँकेच्या एटीएम जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे.
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे फिर्यादी यांच्या एटीएम कार्ड मधून खरेदी केलेले ४५,००० रुपयांचे सोने,रोख रक्कम ४९,७०० रुपये,एक ५०,००० किमतीची मोटर सायकल तसेच वेगवेगळ्या बँकेचे एकूण ६२ डेबिट कार्ड एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींवर भादवी कलम ४२०,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.












