पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १२ : नव्याने उद्घाटन झालेल्या एनडीए चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि जिल्हा प्रशासनाला आढावा बैठकीत आवश्यक पावले उचलण्याचा सूचना दिल्या जातील, असे ते म्हणाले.
उद्घाटनावेळी या चौकाचे नामकरण चांदणी चौक ते एनडीए असं करण्यात आलं असून येथे नव्या उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र, गर्दीच्या वेळेत तासनतास अडकून राहिल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट झाल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
दरम्यान, एनएचएआय अधिकाऱ्या ंचा असा दावा आहे की साइटवरील फिनिशिंग कामासह अनेक कामं अद्याप सुरू आहेत ज्यासाठी हा रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी अल्प कालावधीसाठी बंद केला जातो, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही कामे शेवटच्या टप्प्यात असल्याने लवकर पूर्ण होतील आणि ती पूर्ण झाल्यावर प्रश्न सुटण्याची शक्यता आहे, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.
१२ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. या बैठकीला महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.












