लोणी काळभोर, दि. 25- एमआयटी आर्ट डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉमध्ये मोफत कायदेविषयक कायदेशिर सल्ला केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. कायदेशीर मदत केंद्रासह विभागातर्फे वित्त आणि कर सेवा केंद्र (सीएफटीएस) केंद्राचीही सुरुवात करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड यांनी सांगितले आहे.
या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन शुक्रवारी मॅनेट इमारतीमधील सभागृहात प्रा.डॉ. कराड यांच्या हस्ते तर टॅक्स आणि बार संघटनेचे अध्यक्ष ऍड. श्रीकृष्ण दिक्षित, कायदेतज्ञ ऍड.अनिसा फनसळकर, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, कुलगुरुंचे सल्लागार शिवशरण माळी, लॉ शाखेच्या अधिष्ठाता डॉ.सपना देव यांच्या उपस्थितीत पार पडले.
विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 च्या कलम 12 अन्वये, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, तस्करी किंवा भीक मागणारे बळी, महिला किंवा मुले, अपंग व्यक्ती आणि इतर पात्र श्रेणींसह उपेक्षित किंवा वंचित अर्जदारांना मोफत कायदेशीर मदत आणि सल्ला मिळवण्याचा अधिकार आहे. मात्र अनेकदा घरातील अथवा बाहेर वादांमध्ये जेव्हा चांगल्या विधिज्ञ मंडळींकडून सल्ला घेण्याची गरज पडते, तेव्हा अशा कायदेशीर सल्ल्यांमध्ये कायदेतज्ञांची फी ही सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर असते. अशा सर्वांसाठी आम्ही मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून लोकांमध्ये कायद्याविषयी जागरूगता पसरवणे, विद्यार्थ्यांना व्यावहारिक कायदेशीर कौशल्ये देणे, कायद्याच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रो-बोनो वर्कला प्रोत्साहन देणे, ही आमची उद्दीष्टे आहेत. तरी जास्तीत-जास्त लोकांनी या केंद्राचा फायदा घ्यावा व त्यासाठी 7391095193 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन, स्कूल ऑफ लॉ च्या अधिष्ठाता डॉ. सपना देव यांच्याकडून करण्यात आले आहे.
‘एमआयटी एडीटी’मध्ये कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र सुरु












