प्रवासात चोरीच्या घटना आपण सर्वाधिक पाहतो. प्रवास पूर्ण होऊन उतरताना एका महिलेचे दागिने लंपास झाल्याची घटना स्वारगेट बस स्थानकावर घडली.
फिर्यादी या महिला असून कवठेमहाकाळ ते स्वारगेट असा बसने त्यांनी प्रवास केला.
स्वारगेटला दरवाजातून उतरताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने फिर्यादीच्या पर्स मधील छोटी दागिन्यांची पर्स चोरी केली.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये भादविक 379 अंतर्गत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत












