बीड/प्रतिनिधी
रिक्षा थेटेगाव धारुरवरून बीडकडे येत असताना व कंटेनर बीड वरून परळीकडे जाताना बकरवाडी फाटा घाटसावळी जवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात रिक्षात असणाऱ्या आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर स्वरूपात जखमी असून एका खाजगी हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजीम शेख राहणार इस्लामपुरा राजू चौक आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटेगाव तालुका धारूर येथे आपल्या सासरवाडीला गेले होते. परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरने आपला ताबा सोडला यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली यामध्ये 1) नसरीन अजीम शेख वय 35, 2)नोमान अजीम शेख वय 13, 3) अदनान अजीम शेख वय 12, या अपघातामध्ये जागीच ठार झाल्याची धक्कदाय घटना घडली रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून यांना उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून पुढील तपास करत आहेत.
कंटेनर व रिक्षाचा भीषण अपघात; अपघातात आईसह दोन मुलं जागीच ठार












