एरंडवणे : एरंडवणे येथे कचरा बाजूला करण्याच्या वादातून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. हि घटना रविवारी (दि २५) रोजी रात्री दहा वाजून ८ मिनिटांच्या सुमारास घडली आहे.
फिर्यादी हे आपल्या घरा बाहेर थांबले असताना, इसमाने सर्वे नं .२०/२१ शामाप्रसाद मुखर्जी गार्डन मागे, एरंडवणे, पुणे येथे रस्त्यात पडलेला कचरा बाजुला करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर तीव्र होऊन इसमाने धारदार लोखंडी हत्यारासह येवुन फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या घराचा दरवाजाचे व पत्र्याचे नुकसान केले आहे.
तेजस कराळे वय ३३ वर्षे, रा. एरंडवणे, पुणे यांनी सदर घटनेची तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात दिली असून आरोपी विरोधात भादविक ५०६ (२), ५०४,४२७, आर्म अॅक्ट कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) (३) कलाम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत
कचरा बाजूला करण्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी












