पुणे : करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 3) ग्रंथसन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षा बेंडीगेरी–कुलकर्णी लिखित ‘वृत्तबद्ध कविता – कला व शास्त्र‘ आणि वैभव वसंतराव कुलकर्णी लिखित ‘गझल – आकृती व आशय‘ या मराठी साहित्यातील अलीकडच्या काळातील महत्वाच्या ग्रंथांचा या कार्यक्रमात जाहीर सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. रंगत–संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्यासह करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, गझलकार अनिल आठलेकर ग्रंथांविषयी बोलणार आहेत.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे गझल संमेलन होणार असून त्यात मिलिंद छत्रे, दास पाटील, स्वप्नील शेवडे, वैशाली माळी, सानिका दशसहस्र, वासंती वैद्य, शैलजा किंकर, अश्विनी देशपांडे, रेखा कुलकर्णी, माधुरी डोंगळीकर यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












