
पुणे : युवा कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना स्वरमंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कलासक्त, पुणे या संस्थतर्फे मंगळवार, दि. 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत युवा गायक विशाल मोघे यांचे गायन होणार आहे. त्यांना प्रणव गुरव (तबला) आणि प्रवीण कासलीकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता बेडेकर गणपती मंदिर, पौड रोड येथे होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












