महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. आता ते अजित पवार गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट करून ही माहिती दिली.
ते म्हणाले की, मी ४८ वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इतक्या वर्षांचा हा प्रवास खूप महत्त्वाचा होता. पण आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. ते पुढे म्हणाले की, मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, परंतु काही गोष्टी न सांगितल्या तर बऱ्याच. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.
कोणत्याही राजकीय पक्षासाठी सत्तेच्या, बेरजेच्या राजकारणात बाबा सिद्दीकीसारखे कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या वादळात मुंबईतील काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला होता. १९९९ च्या निवडणुकीत थोडीबहोत उभारी आली, त्यावेळी जे काही थोडेथोडके आमदार निवडून आले, त्यात सिद्दीकी एक होते. त्याआधी १९९२ ते १९९७ या कालावधीत ते काँग्रेसचे नगरसेवक होते. अगदी लहान वयातच ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.