मुंबई : अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींनतर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासह अशोक चव्हाणांच्या आमदाराकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे.
आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्विट केलं आहे. “अशोक चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?” असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.