कात्रज घाटात धारदार शस्त्र दाखवत सोन्याची साखळी चोरी केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 01:45 च्या दरम्यान ही घटना घडली.
फिर्यादी देवानंद गालफाडे राहणार ईस्ट मुंबई हे चार चाकी वाहनातून भोर कडून पुण्याच्या दिशेने येत होते. जुना सातारा पुणे रस्त्यावरील कात्रज घाटाच्या जवळ फिर्यादी आले असता मागील दुचाकी वरील तीन इसमांनी एकसारखा हॉर्न वाजवला. फिर्यादी यास वाटले की काही झाले असावे ते बघण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. दुचाकी वरील इसम गाडीच्या बाजूला आले. हे पाहून फिर्यादी यांनी गाडीची काच खाली घेतली असता इसमांनी शस्त्र दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून तेथून पसार झाले.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये भादविक 392 34 आर्म एक्ट 4 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत
कात्रज घाटात धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरी












