पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.२६ : दीड महिन्यांपूर्वी वाहतुकीचे नियमन करत असताना पोलिस अंमलदार यांनी ट्रिपल जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याने बाचाबाची झाली होती.
त्याचा राग मनात ठेवून दि.२५ आर्मी जवानाने पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.ही घटना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ घडली.
रमेश ढावरे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे तर वैभव संभाजी मनगटे असं आर्मी जवानाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.












