पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१५ : घरगुती वादातून चुलत्याने पुतण्यावर गोळ्या झाडल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. ही घटना १३ ऑगस्टच्या रात्री आठच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी विकास जाधव यांनी आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
प्रदीप तुकाराम जाधव (वय ४४ रा लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटनेत आरोपीने परवाना असलेल्या बंदुकीतून फिर्यादी जाधव यांच्यावर तीन राऊंड फायर केले आहेत. सदर आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३०७, आर्म अॅक्ट २७,३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.
किरकोळ वादातून चुलत्याने पुतण्यावर झाडल्या गोळ्या












