नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) च्या अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता,कला,कौशल्य यांचा विकास व्हावा यासाठी केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 वायुसेनास्थल नेहमीच नवनवीन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे.
NEP ने ठरवून दिलेली शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्याकरता शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रभावी अध्यापन व्हावे यासाठी विद्यालयामध्ये तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.NEP 2020 च्या परिवर्तनात्मक तत्वाशी संरखित, अत्याधुनिक शिक्षण पद्धती, खेळण्यावर आधारित अध्यापन पद्धती,अनुभवात्मक शिक्षण,ICT चलित शिक्षण,सर्व समावेशक शिक्षण या सत्रांचा समावेश या कार्यशाळेमध्ये केला गेला.
या कार्यशाळेमध्ये विद्यालयाच्या एकूण 22 प्राथमिक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यशाळेच्या समारोप मध्ये प्राचार्य श्री.भारत भूषण यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सहभागी शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यशाळा राबवण्याच्या उद्देशाविषयी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय कुमार पाटील यांनी सांगितले की, “कुठल्याही शैक्षणिक धोरण हे शैक्षणिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ठरविलेले असते त्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची आहे शिक्षक जेव्हा अध्यापन क्षमता कौशल्य विकसित करेल तेव्हा खऱ्या अर्थाने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल”.












