पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदी कामगार नेते व माजी नगरसेवक कैलास कदम कार्यरत आहेत.
मात्र एकाच वेळी काँग्रेसची अनेक पदे कदम भूषवत असल्याने त्यांना पदावरून काढण्याची मागणी पिंपरी चिंचवड मधील काँग्रेसचेच पदाधिकारी करत आहेत. यासंदर्भात (दि.५) पिंपरी चिंचवड येथे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
पूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष हे पद सचिन साठे यांच्याकडे होते. त्यांनी २५ वर्षे काँग्रेसच्या या पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांना आमदार या पदासाठी विधान परिषदेचे तिकीट हवे होते, ते त्यांना मिळाले नाही. म्हणून त्यांनी अध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर कैलास कदम व अन्य सदस्यांची नावे या पदासाठी सुचवण्यात आली होती, त्यामधून कैलास कदम यांची नियुक्ती झाली. पण काँग्रेसच्या नियमानुसार एक व्यक्ती अनेक पदांवर कार्य करू शकत नाही.
या अनुषंगाने कैलास कदम यांना पदावरून हटवण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्याकडे मागणी करणार आहेत.












