पुणे प्रतिनिधी
पुणे दि. १४ : पुणे प्रतिनिधी
पुणे दि. १४ : कोंढवा व समर्थ पोलीस स्थानकाच्या हद्दीत दहशत पसरणाऱ्या आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. वसीम ऊर्फ लाल रसीद हजारी (वय ३९ रा. साईबाबानगर, कोंढवा-खुर्द) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४० वी स्थानबद्धतेची कारवाई आहे.
सदर आरोपी हा रोकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या साथीदारांसह कोंढवा,समर्थ,खडक, वानवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत कोयता, पिस्टल सारख्या जीवघेण्या हत्यारासह खुनाचा प्रयत्न,दरोडा,जबरी चोरी, विनयभंग,दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी आहे.सदर आरोपी विरोधात मागील पाच वर्षामध्ये आठ गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी विरुधात एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात १ वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक पी.सी.बी.गुन्हे शाखा आनंदराव खोबरे यांनी पार पडले आहे.












