पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १7 : पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. १६ रोजी रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते. हा रुट मार्च प्रतिभाताई पवार शाळा येथे घेण्यात आला होता. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या रुट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कोंढवा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार, मार्शल यांनी शस्त्र, लाठी, हेल्मेट घेवुन रुट मार्च केला. रूट मार्च दरम्यान सीआर मोबाईल मधुन व मार्शल वरील पी.ए. सिस्टीम वरून नागरीकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच पोलीस मदतीसाठी ११२ नंबरवर कॉल करावा अशा सुचना देखील देण्यात आल्या. रूट मार्च झाल्या नंतर पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख यांनी अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना दिल्या.
हा रूट मार्च हा मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पोलीस पुणे शहर, श्री.संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रंजन शर्मा, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष • सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे – १.२ तसेच सी. आर. मोबाईल तपास पथक अधिकारी असे १३ अधिकारी व पोलीस स्टेशन कडील ४० अंमलदार, आर.सी.पी. ५. बाहेरील बंदोबस्त ०४ अधिकारी, १५ अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडला.












