पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.२६ : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त “मन बहरलं शब्द सुरांनी” या गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून दोन पिढ्यांना समृध्द करणारा दूर रानात ते रौंदळ पर्यंतचा मंत्रमुग्ध करणारा मेलडीचा प्रवास व आदर्श संगीतकाराची लोकप्रिय गीते या मैफिलीत प्रसिद्ध संगीतकार व पार्श्वगायन हर्षित अभिराज व त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. सदर मैफिल ही लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ या ठिकाणी सायंकाळी ७. ३० वा पार पडणार आहे. सदरील मैफिल विनामूल्य असून जास्तीतास्त पुणेकरांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मैफिलीचे आयोजक अॅड. गणेश सातपुते यांनी केले आहे.
मेलडी आणि शब्द यांना प्राधान्य देत भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा उत्तम मेळ साधत व्यावसायिक आणि कलात्मक या दोन्ही स्तरांवर यशस्वीपणे वाटचाल करत मराठी चित्रपटां सोबतच आता बॉलिवूडमध्येही पदार्पण करणाऱ्या हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या गाण्यांच्या यू ट्यूब वरील एकूण व्ह्यूजनी आता ३५ करोड चा टप्पा पार केला आहे.
डॉ एस पी बालसुब्रमण्यम , अनुराधा पौडवाल , कवीवर्य ना. धो. महानोर, सोनू निगम, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम, प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री अशा मान्यवर व्यक्तीनी हर्षित अभिराजच्या कामाचं कौतुक केलं आहे. आपल्या दर्जेदार संगीत रचनांसोबतच आपल्या उत्तम आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार्या हर्षित अभिराज यांचे ६५० हून अधिक स्टेज शोज भारतभर आणि परदेशात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले आहेत़. सदरील मैफिल ऐकण्याची व दुग्धपान करण्याची संधी पुणेकरांनी मिळाली आहे.












